Saturday, December 21, 2024

/

मूलभूत नागरी सुविधांबाबत झाली अधिकाऱ्यांची बैठक

 belgaum

आगामी काळात मूलभूत सोयी सुविधांच्या बाबतीत शहरवासीयांकडून कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, यासाठी आज आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्मार्ट सिटीसह संबंधित सर्व खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली.

आमदार ॲड. बेनके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरासह बेळगाव उत्तर मतदारसंघातील जवळपास सर्व मूलभूत नागरी सुविधांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीसंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, नववर्षाच्या निमित्ताने आज स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका आयुक्त, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खाते आणि अन्य विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकूणच बेळगाव शहरात येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत मूलभूत नागरी सुविधांबाबत कोणत्याही तक्रारी येऊ नयेत यासंदर्भात चर्चा करून सूचना देण्यात आल्या. विशेष करून पाण्याची समस्या आगामी काळात भेडसावू नये याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली.Benke

शहरातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जेथे-जेथे गळती आहे या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी. जेथे चार दिवसांनी एकदा पाणी येते ते त्यावेळी आलेच पाहिजे. जर या संदर्भात काही अडचणी येणार असतील तर पर्यायी सोय म्हणून टँकरची व्यवस्था केली जावी असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कोरोना संदर्भात विशेष काळजी घेतली जावी यासाठी आजपासून 15 वर्षावरील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे असे सांगून सिव्हील हॉस्पिटल अर्थात बीम्स येथील सेवा सुविधांबाबतही बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.

आगामी काळात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आवश्यक सर्व ती सिद्धता करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. तेंव्हा लोकांनी घाबरून न जाता सर्वप्रथम आपले लसीकरण करून घ्यावे अशी माझी विनंती आहे, असेही आमदार ॲड अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.