वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सिद्धकला सांबरा संघाने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धातून अनेक विजय मिळवत क्रिकेटप्रेमींच्या मनात वेगळी छाप निर्माण केली होती तोच उत्साह आजही सिद्धकला क्रिकेट संघाच्या सीनियर खेळाडूत कायम आहे.क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केलं आहे असे मत बेळगाव लाईव्ह डॉट कॉम चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून सांबरा सिद्धकला संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रकाश बेळगोजी (बेळगाव live),यल्लप्पा हरजी(सकाळ) युवराज पाटील(तरुण भारत) प्रा. आनंद आपटेकर आदींचा सत्कार करण्यात आला.पर्यावरणाचा संदेश देताना रोपटे भेट देऊन ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी सिद्धकला सांबरा चे माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई,यल्लप्पा पाटील,सलीम काजी,प्रकाश पाटील नितीन देसाई, मोहन हरजी अरुण जत्राटी, ईश्वर कांबळे, मल्लाप्पा कांबळे, यल्लाप्पा कांबळे, श्रीकांत सनदी, प्रकाश चौगले, प्रकाश करेलकर,विक्रात नाईक, सुमित नागन्नावर, मारुती यड्डी, परशराम कांबळे, राजू कांबळे, शिवाजी मलाई, गुरुनाथ अष्टकर, एकनाथ सनदी, महेश गिरमल,संजय चौगुले आदी उपस्थित होते.
गुरुवारीचे सांबरा क्रिकेट स्पर्धेचे अपडेट्स
चांगळेश्वरी स्पोर्ट्स येळ्ळूर, इंडियन बॉईज, हिंडलगा, सलमान स्पोर्ट्स, पंतबाळेकुंद्रीया संघांनी गुरुवारी झालेल्या सामन्यामध्ये विजय संपादन केले.
शुक्रवारी होणारे सामने
1) अयोध्या कडोली विइंडियन बॉईज, मारिहाळ सकाळी 8 वा.
2) कलाप्रसाद सांबरा वि. मराठा स्पोर्टस, बसरीकट्टी सकाळी 10 वा.3) सलमान स्पोर्ट्स, पंतबाळेकुंद्रीवि. श्री गणेश कणबर्गी दु 12 वा.4) जिजामाता निलजी वि. चव्हाटा शिनोळी दु 2 वा.
5) तिसऱ्या सामन्यातील विजेते वि. कलमेश्वर कल्लेहोळ यांच्यात दु 3.30 वा.