प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बेळगाव येथील श्रुती अवरोळी
ही बीएसएफच्या महिला मोटर सायकल संघाचा भाग होती.
बेळगावच्या मूळ रहिवासी असलेल्या श्रुती अवरोळी-पाटील या तुकडीत होत्या.
नवी दिल्लीतील राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या मोटरसायकल पथकाने राष्ट्रपतींना अभिवादन सादर करून एक अप्रतिम प्रदर्शन केले.
श्रुती गणेशपूर येथील आहे.
श्रुतीचे वडील लष्करातून मेजर म्हणून निवृत्त झाले होते. श्रुतीला २०१२ मध्ये बीएसएफमध्ये सामील करण्यात आले होते.आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी श्रुतीने मिळवली आणि बेळगावची मान उंचावली आहे.
लष्कर सारख्या खडतर क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढत चालला आहे. बेळगाव शहर परिसरातील अशा अनेक तरुणींचे प्रतिनिधी म्हणून श्रुती आपले नाव उंचावत आहे. वडिलांच्या पाठोपाठ लष्करी दलामध्ये ते ही सीमा सुरक्षा दला सारख्या खडतर ठिकाणी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात श्रुतीने मोठी भूमिका निभावली आहे.
त्यामुळे तीच्याकडे बघून नवा दृष्टिकोन शोधण्यात तरुणी आघाडी घेत आहेत. अनेक तरुणी तिच्याकडून प्रेरणा घेऊन लष्करात दाखल होणार आहेत.