आज शुक्रवारी सायंकाळी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीन नुसार बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात 725 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर दोन महिला आणि एक पुरुष अशा तीन रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
725 नव्या रुग्णांपैकी बेळगाव तालुक्यातील 244 याच्यासह, चिकोडी 109,सौंदत्ती तालुक्यात 77,हुक्केरी तालुक्यात 33, रामदु्र्ग तालुक्यातील 52,खानापूर तालुक्यात 53,अथणी तालुक्यात 66 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
सहा हजार रुग्ण उपचार घेत आहेत.2971 जणांचा अहवाल अध्याप प्रतीक्षेत आहे. आत्तापर्यंत कोरोना मुळे जिल्ह्यात 964 जणांचा मृत्यू झाला आहे.