माजी उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या संपर्कात आहेत, असे विधानपरिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी सांगितले आहे,आपले बंधू रमेश यांच्यानंतर त्यांनी नवीन बॉम्ब टाकला आहे.
आमदार लखन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या जेडीएस आणि भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत.
डीकेशी यांच्याशी सवदी यांनी बोललेला मोबाईल क्रमांक आमच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. लक्ष्मण सवदी वेगळ्या नंबरवरून डीकेशीशी बोलतात. लखन जरकीहोळी म्हणाले की,अनेकजण डीकेशी यांच्या संपर्कात आहेत.
रमेश, भालचंद्र जारकीहोळी यांच्याकडे 16 नव्हे तर 20 आमदार भाजप मध्ये आणण्याची ताकद आहे. बैलहोंगल, खानापूर आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस आमदार संपर्कात असल्याचा दावा रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना रमेश जारकीहोळी 16 काय 20 काँग्रेस आमदारांच्या संपर्कात असतील तेवढी शक्ती आणि क्षमता त्यांच्यामध्ये आहे. कोणतेही काम मनात आणले तर रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी करून दाखवतात. असे मतही विधानपरिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात बलाढ्य असतात.
मात्र रमेश आपल्या मतदारसंघात नव्हे तर अथणी, बैलहोंगल, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर अशा मतदारसंघात स्ट्राँग आहेत. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये कोणी जाणार नाही .मी स्वतः आपक्ष म्हणूनच काम करणार आहे .कारण बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मला काम करायचे आहे असे त्यांनी सांगितले.