बेळगाव मनपा निवडणूक होऊन चार महिने उलटले तरी मनपाची महापौर उपमहापौर निवडणूक झालीचं नाही त्यामुळे अनेकदा यावर नाराजी व्यक्त केली गेली मात्र अद्याप याकडे कानाडोळा करण्यात आला होता.
मनपाचे नूतन नगरसेवक हे केवळ चहा बिस्किटे पुरता आहेत आणि शहराचे दोन्ही आमदार हेच महापौर उपमहापौर आहेत त्या दोघांना या पदांचे गाऊन भेट देऊ अशी बोचरी टीका केल्या नंतर बेळगाव मनपा निवडणूक दिरंगाई बाबत पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले आहेत.
महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि 58 नगरसेवक निवडून आले. मात्र बेळगाव शहराचा राज्यकारभार दोन आमदारांच्या हातातच आहे असा अप्रत्यक्ष आरोप सतीश जारकीहोळी यांनी यानिमित्ताने करत मनपा निवडणूक लवकर घ्या हा संदेश सत्तारूढ पक्षाला दिला आहे हा आरोप करून ते थांबले नाहीत तर सध्या बेळगाव दक्षिणचे आमदार हे महापौरांच्या भूमिकेत आहेत तर बेळगाव उत्तरचे आमदार उपमहापौरांच्या भूमिकेत आहेत असा आरोप देखील सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.
यामुळे महानगर पालिका निवडणुकीनंतर निवडून आलेले 58 नगरसेवक पूर्णपणे कुचकामी असून बेळगाव शहराचा कारभार फक्त दोन्ही आमदारच सांभाळत असल्याचा अर्थ निघतो आहे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आमदारांचा वाढता हस्तक्षेप पसंतीस न पडल्यामुळे असा आरोप करण्यात आला असेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोप करणार्या सतीश जारकीहोळी यांनी आपण आता दोन्ही आमदारांना काँग्रेसच्यावतीने दोन गाऊन भेट देणार आहोत. महापौर आणि उपमहापौर यांचे गाऊन दोन आमदारांना भेट दिले जातील. त्यामुळे त्यांनी अधिकृतरीत्या आपला कारभार सुरु करावा. असा टोलाही सतीश जारकीहोळी यांनी मारल्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे बेळगाव शहरातील राजकीय गोटात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महानगरपालिकेत भाजपने सर्वाधिक नगरसेवक निवडून दिले यामुळे आधीच काँग्रेस पक्ष नाराज आहे. काँग्रेसनेही महानगरपालिका निवडणुकीत आपले उमेदवार देऊन नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला .अशा वातावरणात महानगरपालिकेचा कारभार लवकरात लवकर सुरळीत सुरू होईल .अशी आशा होती मात्र तो न झाल्यामुळे काँग्रेस तर्फे त्यातून आरोप होत असून त्यापैकी हा गंभीर आरोप झाला असल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
एकूणच कधी एकदा महापौर निवडणूक होईल आम्ही शपथ कधी घेऊ आणि मनपाचा कारभार कधी सुरळीत होईल याची चर्चा असून नूतन नगरसेवकांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.