Sunday, January 5, 2025

/

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

 belgaum

छत्रपती संभाजी महाराज यांचा 342 राज्याभिषेक दिनानिमित्त धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समिती यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी महाराज यांच्या मूर्तीला लोकप्रिय आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच पुजा करण्यात आली.

धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समिती बेळगाव यांच्या वतीने संभाजी चौक बेळगाव येथील धर्मवीर संभाजीराजेच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला.छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव व आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराचे आमदार अनिल बेनके यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा 16 जानेवारी 1681 मध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. शंभूराजांचा आज राज्याभिषेक बेळगाव शहरात साजरा होत आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याची सर्व जबाबदारी त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आली.त्यामुळे शंभूराजांनी खचलेल्या रयतेला आधार देत आपला राज्याभिषेक करून घेतला. यावेळी त्यांनी जनतेला शिवरायांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील, याची ग्वाही दिली. Sambhaji maharaj rajyabhishek

शंभुराजे लहानपणापासुनचं जिजाऊ आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत होते. शिवरायांच्या सुचनेनुसार शंभुराजेंनी पन्हाळ्यावरुन राज्यकारभार सुरु केला. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनचं मिळाले होते. तर यंदाच्या शंभूराजेंच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या शौर्याला करा सलाम.असे बेनके यांनी उपस्थित शिवभक्तांना सांगितले

प्रास्ताविकात राजू शेट्टी यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. तसेच प्रसाद मोरे यांनी आभार मानले. यावेळी श्रीनाथ पवार, आदींसह पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.