भारतीय शरीरसौष्ठवपटूंचा महासंघ अर्थात इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनतर्फे आयोजित देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या 13 व्या मिस्टर इंडिया -2021 शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन -2021 अर्थात मि. इंडिया’ किताब सेंट्रल रेव्हन्यू स्पोर्ट्स अँड कल्चरल बोर्डच्या सागर कतुर्डे याने हस्तगत केला आहे.
खम्माम तेलंगणा येथे सदर राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेची शरीरसौष्ठव स्पर्धा गेल्या 6 ते 8 जानेवारी या कालावधीत यशस्वीरित्या पार पडली. सदर वजनी गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे. पुरुष गट 55 किलो वजनी गट : 1) सुरज आर. के. (केरळ), 2) जगतज्योती चक्रवर्ती (रेल्वे स्पोर्ट्स), 3) एल. नीता सिंग (मणिपूर), 4) एन. जॉन बुश सिंग (तेलंगणा), 5) जी. धयालण (तामिळनाडू).
60 किलो वजनी गट : 1) वैभव महाजन (रेल्वे स्पोर्ट्स), 2) भुपेंद्र सिंग (रेल्वे स्पोर्ट्स), 3) टी. रोनिकांत मैतयी (सर्व्हीस स्पोर्ट्स), 4) आर. के. एम. तोंबा (सर्व्हीस स्पोर्ट्स), 5) एम. बी. विघ्नेश (तामिळनाडू). 65 किलो वजनी गट : 1) प्रदीप कुमार वर्मा (पंजाब), 2) परिषीत हजारिका (आसाम), 3) बिचित्र नायक (ओडिसा), 4) अजितसिंग जामवाला (जम्मू-काश्मीर), 5) राजू खान (आसाम).
70 किलो वजनी गट : 1) तौसिफ मोमीन (महाराष्ट्र), 2) शशी (दिल्ली), 3) संदीप (दिल्ली), 4) महीप कुमार (रेल्वे स्पोर्ट्स), 5) आशिष मान (सेंट्रल रेव्हन्यू ). 75 किलो वजनी गट : 1) सी राहुल (रेल्वे स्पोर्ट्स), 2) अनिष कुमार पीएस (सर्व्हीस स्पोर्ट्स), 3) अश्विनी शेट्टी ए (रेल्वे स्पोर्ट्स), 4) जगन्नाथ कुंतिया (ओरिसा), 5) आशिष लोखंडे (महाराष्ट्र).
80 किलो वजनी गट : 1) सागर कतुर्डे (सेंट्रल रेव्हन्यू), 2 ) सर्बो सिंग (रेल्वे स्पोर्ट्स), 3) प्रशांत नायक (उत्तर प्रदेश), 4) गणेश जाधव (रेल्वे स्पोर्ट्स), 5) दादासाहेब शिंदे (महाराष्ट्र). 85 किलो गट : 1) आर. कार्तिकेश्वर (तामिळनाडू), 2) निलकंठ घोष (पश्चिम बंगाल), 3) अशपाक एमडी (रेल्वे स्पोर्ट्स), 4) श्रीकांत सिंग (उत्तर प्रदेश), 5) संदीप उली (महाराष्ट्र ).
90 किलो वजनी गट : 1)एम. श्रवणन (तामिळनाडू), 2) माराडोन क्षेत्रीमम (मनिपुर), 3) देवेंद्र पाल (उत्तर प्रदेश), 4) जयदेव सिंग (सर्व्हीस स्पोर्ट्स), 5) एस. मोहन सुब्रमण्यम (रेल्वे स्पोर्ट्स). 90 ते 100 किलो वजनी गट : 1) पवन कुमार (सर्व्हीस स्पोर्ट्स), 2) महिंद्र चव्हाण (महाराष्ट्र), 3) प्रेमजित (सीआरपीएफ), 4) अमन राणा (पंजाब), 5) अजय पुंडीर (उत्तराखंड). 100 किलोवरील वजनी गट : 1) नितीन चंडिला (हरियाणा), 2) जावेद अली खान (रेल्वे स्पोर्ट्स), 3) निलेश दगडे (महाराष्ट्र), 4) मुकेश चौधरी (आयबीबीएफ)
राष्ट्रीय पातळीवरील या शरीरसौष्ठव स्पर्धेअंतर्गत मेन्स स्पोर्ट्स फिजिक आणि मेन्स फिटनेस फिजिक या दोन प्रकारच्या स्पर्धादेखील घेण्यात आल्या. सदर राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेच्या टायटलसह विविध पुरस्कार विजेते शरीरसौष्ठवपटू पुढील प्रमाणे आहेत. मोस्ट इम्प्रुव्हड ॲथलिट : नितीन चंडीला (हरियाणा). बेस्ट पोझर : एस. कृष्णराव (इंडियन पोस्ट). सांघिक विजेतेपद : रेल्वे स्पोर्टस प्रोमोशन बोर्ड (225 गुण), द्वितीय क्र. तामिळनाडू (130 गुण) तृतीय क्र. स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (120 गुण). चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स -2021 : सागर कतुर्डे (सेंट्रल रेव्हन्यू स्पोर्ट्स अँड कल्चरल बोर्ड), द्वितीय क्र. आर. कार्तिकेश्वर (तामिळनाडू), तृतीय क्र. एम. श्रवणन( तामिळनाडू). या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बेळगावचे राष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच अजित सिद्दण्णावर यांच्यासह अन्य मान्यवरांनी काम पाहिले. विशेष म्हणजे ही स्पर्धा मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे होऊ शकली नसल्यामुळे ती या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात घेण्यात आली.