रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे नुकत्याच आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षक दिनकर पाटकर आणि हॉटेल व्यावसायिक चंद्रशेखर शेट्टी यांना ‘रोटरी व्होकेश्नल अवॉर्ड 2021 -22’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रो. मिलिंद पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे ऑक्सिजन मॅन व्यंकटेश पाटील उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते शिक्षक दिनकर पाटकर यांना शैक्षणिक क्षेत्रात आणि चंद्रशेखर शेट्टी यांना रेस्टॉरंट व हॉटेल व्यवसायात स्वतः पलीकडे जाऊन उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल रोटरी व्होकेश्नल अवॉर्ड 2021 -22 देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर कौमुदी पाटणकर यांनी पाटकर सरांचा परिचय करून देऊन त्यांची विद्यार्थिनी या नात्याने आपले अनुभव कथन केले. रो. डॉ. के. एम. केळुसकर यांनी चंद्रशेखर (चंदू) शेट्टी यांचा परिचय करून दिला.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास क्लबचे सेक्रेटरी लक्ष्मीकांत नेतलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. रो. डॉ. श्रीधर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.