आपली आवड आपल्याकडे असलेली कौशल्य ओळखून ध्येय निश्चित करा. त्यामुळे आयुष्यामध्ये लवकर आपले ध्येय साध्य होईल. आपल्या ध्येयावर प्रेम करा त्यामुळे उद्या कडे जाणारा प्रवास हा सुखकर होईल असे मार्गदर्शन के के ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निपाणी चे संचालक केतन शहा यांनी केले.
बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विद्यापीठात करिअर मार्गदर्शन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव मराठी विभाग प्रमुख डॉ विनोद गायकवाड डॉ चंद्रकांत वाघमारे,डॉ. मनीषा नेसरकर,डॉ.मैनोद्दीन मुतवली पवन सोनारकर दिपाली विकेटनी व्यासपीठावर उपस्थित होते.
ते म्हणाले की स्पर्धापरीक्षांमध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही सोशल मीडियाचा वापर आपले ध्येय साध्य करण्यासाठी करा त्याला आपल्या ध्येयातील अडथळा बनू नका जिद्दीने आवड असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
मनीष डॉ मनीषा नेसरकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली त्यावेळी सरकारी खाजगी तसेच उद्योग क्षेत्रातील विविध संधींची माहिती देण्यात आली.
युपीएससी-एमपीएससी, के पी सी, आर आर बी, एस एस सी यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी माहिती तसेच त्यांना आवश्यक असणारा संदर्भ ग्रंथाची माहिती दिपाली विकेटनी यांनी दिली.
मैनुद्दीन मुतवली यांनी आभार मानले या विभागातील प्रथम व द्वितीय वर्षीय एम ए आणि पीएचडी चे विद्यार्थी उपस्थित होते.