रोजगार हमी योजनेतील महिलांचा पगार द्या. या मागणीसाठी शेकडो महिला आज रस्त्यावर उतरल्या होत्या. रोजगार हमी योजनेत काम करणार्या महिलांनी रास्ता रोको करून मन्नुर गोजगा रस्त्यावर तीव्र आंदोलन केले.
अनेक महिने काम करूनही पगार दिला जात नाही. त्या संदर्भातील रोष व्यक्त केला असून आपला पगार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्या बरोबरच रोजगार हमी योजनेतील संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी.
पगार रोखून धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला होता. एकीकडे रोजगार हमी योजना यशस्वी असे सांगण्यात येत असताना रोजगार हमी योजना अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झाल्यामुळे त्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात होणार आहे.
ग्रामीण महिलांना योग्य काम आणि रोजगार मिळावा या हेतूने सुरू करण्यात आलेल्या योजनेत महिला रस्त्यावर उतरल्यामुळे अधिकाऱ्यांचा गैरकारभार समोर आला असून संबंधित अधिकाऱ्यावर जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून कोणती कारवाई केली जाणार? हा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे .
रोजगार हमी योजनेत काम करून घेतल्यानंतर वेळच्यावेळी पगार देण्याची भूमिका प्रशासनाने राबवायला हवी होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.