Friday, January 3, 2025

/

‘त्या’ पोस्ट विरोधात काँग्रेसची निदर्शन

 belgaum

गोवा राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या राष्ट्रीय पक्षातील एका नेत्याने स्वतःच अश्लीलतेचा बाजार मांडत मर्यादा ओलांडली आहे.दारूच्या नशेत स्वतःच स्वतःचे नग्न फोटो व्हायरल केले आहेत असा आरोप करत याविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अश्लील फोटो पक्षाच्या कर्नाटक ग्रुपवर त्याने स्वतःच टाकले असून बेधुंद अश्लीलतेचा नंगा बाजार किळसवाणा ठरला आहे.दरम्यान त्या ‘व्यक्तीने’ आपला एक व्हिडिओ प्रसारित करून हा प्रकार व्हॉट्सॲप वेब चा वापर करून कुणीतरी खोडसाळपणा केला असून यात आपला काहीच संबंध नाहीअसे सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

या प्रकाराविरोधात काँग्रेसने तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.जिल्हा काँग्रेसच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यालया समोर जमून आपला संताप व्यक्त केला व त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकारामुळे तो नेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका खाटेवर पडलेला आणि नग्न अवस्थेतला त्याचा फोटो त्याने स्वतःच एका व्हॉट्सॲप ग्रुप वर टाकला आहे.अश्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

निवडणूक प्रभारी म्हणून काही मतदार संघाच्या प्रचाराची जबाबदारी असताना या महोदयांनी नेमके काय चालविले आहे?असा प्रश्न विचारण्यात आला असून फक्त त्या पक्षाचीच सोडा तर बेळगाव जिल्ह्याचीही लाज या व्यक्तीने काढली आहे.असे मत काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी मांडले आहे.Congress protest

निवडणुकीच्या प्रचाराला गेलात की ऐयाशी करायला असा प्रश्न विचारण्यात येत होता,दरम्यान आंदोलन स्थळी ती व्यक्ती असलेल्या पक्षाचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न एका काँग्रेस कार्यकर्त्याने केला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते एकूणच निवडणूक गोव्याची असली प्रकार जरी गोव्यात घडला असला तरी त्याची धग मात्र बेळगावात पोहोचली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाट्स अप ग्रुप वर पडलेला अश्लील फोटो त्यांच्याच पक्षातील ग्रुप मध्ये असलेल्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल झाला होता आता या प्रकरणाची चर्चा मात्र राजकिय वर्तुळात रंगू लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.