संपूर्ण कर्नाटक राज्यावर सध्या 60000 रुग्णांचा केसलोड आहे, तर त्यापैकी फक्त 117 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मागील लाटेप्रमाणे केसलोडचा ताण अद्याप आयसीयुवर वाढला नाही ही समाधानाची बाब आहे.
त्यामुळे कोरोना झाल्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा सावधगिरीने त्याला तोंड देण्याची गरज असून औषध उपचारांना योग्य प्रतिसाद दिल्यास लवकरात लवकर रुग्ण बरे होत आहेत. ही सकारात्मक माहिती सुद्धा उपलब्ध झाली आहे.
कर्नाटकात पॉझिटिव्हिटी अर्थात सकारात्मकता दर वाढत असला तरी मृत्यूचा दर मात्र वाढलेला नाही. ही सकारात्मक बाब उघड झाली आहे. पॉझिटिव्हिटी वाढली तरीही उपचार केल्यानंतर रुग्ण बरे होऊन परत जात आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पॅनिक अटॅक मध्ये न अडकता आपल्याला लक्षणे आढळल्यास व लक्षणे न आढळता पॉझिटिव्हिटी आढळल्यास नागरिकांनी उपचारांना योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे.
सध्या उपचार घेत असलेले बरेच रुग्ण कोरोना मुळे निर्माण झालेल्या समस्या नव्हे तर इतर अनेक कारणातून आयसीयुमध्ये आहेत. त्यापैकी अनेक जण पूर्ण बरे झालेले आहेत अशी माहितीही सरकारने उघड केली आहे. अपघात, एखादी शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांनी इस्पितळात दाखल होताना कोरोना संदर्भातील चाचणी केल्यानंतर लक्षणे आढळली म्हणून संबंधित उपचारांच्या बरोबरीने कोरोना वरील उपचार करण्यासाठी संबंधितांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे.
त्यामुळे आयसियू मध्ये असले तरी ते कोरोणाच्या समस्यांनी नव्हे हे लक्षात घेण्याची गरज आहे. ओमिक्रोन अथवा कोरोना संदर्भातील लक्षणे आढळल्यास आपला मृत्यू होईल का? अशी भीती बाळगण्यापेक्षा नागरिकांनी सकारात्मकपणे आजाराला सामोरे जाण्याची गरज आकडेवारीमुळे दिसून आली असून प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.