कर्नाटकात यापुढे नवीन इंजीनियरिंग कॉलेज ला परवानगी दिली जाणार नाही. असा आदेश व्हीटीयु विद्यापीठाने दिला आहे. कर्नाटकातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अनेक जागा प्रवेशविना रिक्त आहेत.
इंजिनीअरिंग क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्यामुळे अनेक कॉलेजमध्ये प्रवेश झाले नाहीत. या परिस्थितीचा विचार करून यापुढे कोणताही नवीन इंजिनिअरिंग कॉलेज ला परवानगी दिली जाणार नाही. असा आदेश विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने दिला आहे.
राज्यात दर्जेदार शिक्षण दिले जावे या दृष्टीने योग्य पायाभूत सुविधा असणाऱ्या कॉलेजनाच यापुढे प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होईल. सध्या राज्यात 230 इंजिनिअरिंग कॉलेज असल्याचे व्हीटीयु ने सांगितले.
कुलगुरू डॉ करीसिधाप्पा यांनी माध्यमांशी बोलताना इंजिनीरिंग कॉलेज ची संख्या कमी करून चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी हा प्रयत्न आहे.
मध्यंतरीच्या काळात आळंबी प्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज उभी राहीली .त्यामुळे तांत्रिक शिक्षणाचा दर्जा घसरत गेला .या वर्षी प्रमाणे पुढील वर्षी हा निर्णय वाढवण्याचा प्रयत्न आहे.असे सांगितले आहे.