साहित्य संमेलन महा मंडळाची बैठक सोमवारी गिरीश कॉम्प्लेक्स येथील भगतसिंह सभागृहात पार पडली.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता 15 फेब्रुवारी पर्यंत सर्व संमेलन पार पाडून घ्यावीत असा बैठकीत ठराव संमत करण्यात आला.
संमेलना संबंधी काही अडचणी असल्यास वक्ते हवे असल्यास साहित्य महा मंडळाकडे विचारणा करावी वक्ते पुरवण्या बद्दल आणि संमेलन आयोजना बद्दल मार्गदर्शन केलं जाईल असे बैठकीत ठरवण्यात आले.
सर्व साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी आपल्या तारखा साहित्य संमेलन महा मंडळाकडे लवकरात लवकर कळवाव्यात असे आवाहन देखील करण्यात आले.
मंथन महिला साहित्य संमेलन हे 27 जानेवारी तर कुद्रेमानी येथील साहित्य संमेलन 26 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
यावेळी साहित्य महामंडळाचे नागेश सातेरी, गुणवन्त पाटील,प्रा. आनंद मेणसे,मधू पाटील, शिवाजी शिंदे, बाबुराव गौडाडकर आदी उपस्थित होते.