Friday, April 19, 2024

/

बेळगाव जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

 belgaum

बेळगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची धास्ती घेत खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळांना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे.

उद्या मंगळवार 11 जानेवारी पासून 18 जानेवारी पर्यंत बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळाना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे.

बेळगावात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कोविड निवारण आपत्ती निवारण समितीच्या सल्ल्यानुसार हिरेमठ यांनी सदर आदेश जाहीर केला आहे

 belgaum

बेळगाव शहरातील कॅम्प भागातील आणि एका उपनगरातील शाळेतील मुलांना कोरोनाची लागण झाली होती याशिवाय कित्तुर येथील सैनिक शाळेतील 80 जणांना कोविडची बाधा झाल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.