महाराष्ट्रातील प्रथित यश लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डाॅ. अनिल अवचट (वय 77) यांचे आज पत्रकारनगर, पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. मराठी साहित्यामध्ये डाॅ. अनिल अवचट यांचे मोलाचे योगदान होते.
बेळगावातील अनेक साहित्यिक संस्थांशी आणि साहित्यिकांशी त्यांचा निकटचा संबंध होता. तसेच बेळगाव परिसरात आयोजित साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सहभाग असायचा.
नव्या पिढीतील उदयोन्मुख लेखकांना मार्गदर्शकाचे काम करणारे आणि दलित लेखकांच्या लेखनात विशेष रुची दाखवून त्यांचे लेखन पुढे आणणारे ज्येष्ठ लेखक म्हणून त्यांची ओळख होती.
पत्रकार असले तरी डाॅ. अनिल अवचट यांनी पत्रकारितेतील व्यवसायिकतेला नकार दिला होता. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.