Tuesday, December 31, 2024

/

स्वामी विवेकानंद हे भारतातील पहिले समाजवादी” -प्रा. आनंद मेणसे*

 belgaum

पारंपारिक विचारांना फाटा देऊन सामाजिक आणि वैज्ञानिक दूरदृष्टीकोणाचा पुरस्कार केला. भाषा ही माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते; बंगाली, इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांवरील असामान्य प्रभूत्वामुळे जगावर प्रभाव स्वामी विवेकानंद यांनी टाकले. आणि अवघ्या कमी वयात संपूर्ण जगाला हादरवून सोडले. शिकागो मधील सर्वधर्म महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करून वेगळेपणाचे तत्वज्ञान मांडले. 1886 ते 1893 या कालावधीमध्ये देश समजून घेण्यासाठी संपूर्ण भारत भ्रमण करून सामाजिक वास्तविकता अनुभवली. सामाजिक विषमतेने जखडलेला समाज पोखरून गेला आहे.

देशासमोरील भूक हा पहिला प्रश्न आहे; भीषण दुष्काळ पडल्यानंतर काँग्रेसला तेंव्हा विचारले भूक हा मुख्यप्रश्न तुमच्या अजेंड्यावर घेऊन यावर कार्य करा असा सल्लाही दिला. त्यावेळी धर्म आणि विज्ञान, वैज्ञानिक दूरदृष्टीकोण जोपासला गेला पाहिजे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तन, सर्व सामान्य जनतेतील दुःख, भूक, दारिद्रय, विरह, अज्ञान, बेरोजगारी, या विळख्यातून भारत मुक्त झाला पाहिजे यासाठी समाजवादाचा आग्रह धरतात. *समाज परिवर्तन झाला पाहिजे यासाठी आग्रह धरून समाजवादी तत्वज्ञान मांडणारे हे भारतातील पहिले व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद हे आहेत.* त्यांच्या वेगळेपणाच्या व्यक्तिमत्वाचा समाजमनावर ठसा उमटवला आहे. यांचे विचार सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. संगीत, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, आरोग्य, योग, या सर्व विषयात पारंगत असल्याने ज्ञान हे सर्व श्रेष्ठ आहे सिद्ध केले.

कोणत्याही प्रकारे आहारी न जाता आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करावा. अवांतर वाचंनानी माणूस परिपक्व होतो यासाठी अधिक वाचन करून ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत कराव्यात. आई-वडील, गुरू , देशभक्ती ठेऊन गौरव केला पाहिजे. आजच्या तरुणांनी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून देश प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न करून एक नवा आदर्श जगापुढे निर्माण करावा. *असे प्रतिपादन जी.एस.एस. पदवी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी “” स्वामी विवेकानंद जीवनकार्य आणि सामाजिक व वैज्ञानिक दूरदृष्टीकोण”” या विषयावर प्रतिपादन केले.*Mense

प्रगतिशील लेखक संघ बेळगांव आणि साम्यवादी परिवार बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने 159 वी स्वामी विवेकानंद जयंती आणि व्याख्यानमालेचे आयोजन शुक्रवार दिनांक 14/012022 रोजी जी. एस.एस. पदवी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आनंद मनसे यांचे “” *स्वामी विवेकानंद जीवनकार्य आणि त्यांचा सामाजिक वैज्ञानिक दूरदृष्टीकोण* “” या विषयावर आधारित व्याख्यान रामदेव गल्ली गिरीष कॉम्प्लेक्स येथील शाहिद भगतसिंग सभागृहात नुकताच कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर ॲड. नागेश सातेरी उपस्थित होते. व्यासपीठार प्रमुख वक्ते जी. एस.एस. पदवी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आनंद मनसे, आनंद कानविंदे, बाबुराव गौंडवाडकर , कृष्णा शहापूरकर, प्रा. दत्ता नाडगौडा, मधू पाटील, शिवलीला मिसाळे व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वागत संदिप मुतगेकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. मयुर नागेनट्टी यांनी केले. सूत्रसंचालन शिवलीला मिसाळे यांनी केले. तर आभार प्रा. निलेश शिंदे यांनी मानले.यावेळी शिवाजी कुट्रे, सदानंद सामंत, ॲड. सतीश बांदिवडेकर, सतिश पाटील, अर्जुन सांगावकर, प्रा. अशोक अलगोंडी, निलेश खराडे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.