Saturday, November 9, 2024

/

खानापूर समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक

 belgaum

खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी मराठी भाषिकांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आता खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचा दुसरा गटही पुढे सरसावला आहे. त्यासंदर्भात या गटातर्फे उद्या सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक उद्या सोमवार दि. 10 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बोलावण्यात आली आहे.

यावेळी 17 जानेवारी 2022 हुतात्मा दिन आयोजनाबाबत चर्चा तसेच खानापूर तालुक्याच्या विद्यमान आमदार सौ. अंजलीताई निंबाळकर यांनी मराठी भाषिक जनतेविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला जाणार आहे.

तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी वेळेतवर उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे आणि चिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.