बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या शहराकडील आवार भिंतीला लागून असणाऱ्या फुटपाथवर एके ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
या ठिकाणी फुटपाथवर सर्वत्र गलिच्छ हिरवट सांडपाणी पसरले आहे. तुंबलेल्या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचार्यांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
बसस्थानकाच्या आतल्या भागात केल्या जाणाऱ्या अस्वच्छतेमुळे हे सांडपाणी आवार भिंतीच्या चरीमधून फूटपाथवर पसरत असल्याचे सांगितले जाते.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या सांडपाण्याचा नेमका उगम शोधून दुरुस्ती व सफाईचे आदेश देऊन सदर फूटपाथ पूर्वीसारखा स्वच्छ ठेवावा, अशी मागणी येथून नेहमी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.