आय पी एस अधिकारी रवींद्र गडादी यांची बेळगाव कायदा आणि सुव्यवस्था डी सी पी पदी नियुक्ती करण्यात आली असून डी सी पी विक्रम आमटे यांची बदली झाली आहे.
गत 31 डिसेंबर रोजी गडादी यांना आय पी एस म्हणून हुबळी इलेक्टरीकल कंपनी एस पी म्हणून बढती देण्यात आली होती तेथून त्यांची बेळगाव कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डी सी पी म्हणून नियुक्ती झाली आहे.
बेळगाव डी सी पी (कायदा आणि सुव्यवस्था) हे पद पोलीस अधीक्षक किंवा विजापूर जिल्हा पोलीस अधीक्षक सारख्या समान दर्जाचे जबाबदारीचे आहे.
गडादी यांनी या अगोदर बेळगाव अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम केले होते त्यावेळी त्यांनी चिकोडी आणि बेळगाव ग्रामीण जिल्ह्यात आपल्या कार्याची चुणूक दाखवली होती आता बेळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या आणि डी सी पी गडादी हे दोघेही नवखे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत.