जिल्ह्यात 18 -20 टक्के मुले कोरोना पॉझिटिव्ह
कोविड तपासणी झालेल्या पैकी बेळगाव जिल्ह्यात जवळपास 18 ते 20 टक्के मुले कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी आज मंगळवारी दिली.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 2153 कोविड सक्रिय रुग्ण आहेत त्यापैकी 18 ते 20 टक्के मुलं आहेत असे त्यांनी नमूद केलं.
जिल्ह्यात आज 324 मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून यापैकी कोणामध्येही गंभीर आजाराची लक्षणे नसल्यामुळे त्यांच्यावर घरामध्येच उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील फक्त 52 बाधित मुलांना सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे उर्वरित सर्वांवर होम आयसोलेशनद्वारे उपचार सुरू आहेत.
यापैकी बहुतांश रुग्ण हे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येण्यास सुरुवात झाली होती अशी माहितीही डाॅ. मुन्याळ यांनी दिली.