बेळगाव शहरातील आदर्श मुचंडी व प्रिया मुचंडी या दाम्पत्याला भारतीय काँक्रीट संस्था आणि अल्ट्राटेक सिमेंट्स कडून उत्तर कर्नाटकासाठी सर्वोत्कृष्ट वास्तुविशारद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
घटप्रभा येथे निर्माण केलेल्या निवासी इमारतीसाठी कर्नाटकचे लघु व मध्यम उद्योग मंत्री मुर्गेश नीराणी यांच्या हस्ते हा पुरस्कार हुबळी येथे देण्यात आला.
आदर्श मुचंडी व प्रिया मुचंडी हे पाईप लाइन रोड, विनायक नगर , बेळगाव येथे D Views नावांची फर्म चालवितात. ही फर्म बेळगाव शहरात आर्किटेक्ट, इंटिरिअर व डिझाइनिंग या क्षेत्रामध्ये नामांकीत आहे.
2017 मध्ये देखील यांना भारतीय काँक्रीट संस्था आणि अल्ट्राटेक सिमेंट्स कडून बेळगाव जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट वास्तुविशारद पुरस्कार मिळाला होता.बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या भारतातील नामांकित ACETECH आर्किटेक्ट इंटिरिअर व डिझाइनिंग प्रदर्शनात त्यांची परीक्षक म्हणून निवड झाली होती.
या दांपत्याने स्वतःची कर्तबगारी व मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे.आर्किटेक्ट इंटिरिअर व डिझाइनिंग क्षेत्रात अशी कामगिरी करून बेळगाव शहराचे नाव उंचविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.