गरिबांचे महाबळेश्वर बुधवारी गारठून गेले होते.सकाळी 10 पर्यंत देखील हवामानात हुडहुडी कायम होती.मॉर्निंग वॉक थंडीचा जबरदस्त तडाखा बसला,नागरिकांनी कान टोप्या स्वेटर शाली पांघरून थंडीचा सामना केला पण अर्थातच गुलाबी थंडीचा आनंदही काहींनी लुटला.
12 जानेवारी रोजी सकाळी बेळगावात कमीतकमी 8.6 डिग्री सेंटिग्रेट तर अधिकाधिक 27.3 डिग्री सिंटिग्रेट तापमानाची नोंद झाली आहे.
आगामी दोन दिवसांत आणखी पारा घसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून 22जाने 2012 साली 6.4℃, तर 16 जानेवारी 2012 रोजी बेळगावात 7.2 ℃ अश्या कमीत कमी तापमानाची नोंद झाली होती तो दिवस बेळगाव मध्ये गेल्या काही वर्षातील निच्चांकी आकडा होता
बेळगाव ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटी भोवती नागरिक शेकून घेताना दृश्ये दिसत होती.परंतु अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतात खोळंबलेली कामे ट्रॅक्टर व बैलांच्या मदतीने जोमाने शिवारात चालू होती.कडपाल पेरणीची लगबग दिसून येत होती अनेक ठिकाणी मशागतीची कामे सुरू आहे.गारठलेलं असतानाही वातावरणात मात्र आल्हाददायक आहे.
चहाच्या ठेल्यावर थंडीची चर्चा करत नागरिक चहाचे घुटके घेताना दिसत होते विशेषतः हनुमान नगर रेस कोर्स,कॅम्प सहपूर्व भागातील बळळारी नाला परिसर रात्री पासूनच गारठला होता.धुक्याची चादर मात्र आज पातळी होती.लोकांनी अंग फुटू नये म्हणून कोल्ड क्रिम थंडी पासून त्वचेच रक्षण करणारे लोशन वापरायला सुरू केली आहे.
मकर संक्राती नंतर एरव्ही सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यावर थंडी कमी होते मात्र गेल्या काही वर्षा पासून फेब्रुवारी महिन्यात म्हणजे वसंत ऋतू त देखील थंडीचे प्रमाण असते असे चित्र आहे.
हवामान खात्याने आगामी आठवड्यात बेळगाव शहराचा हवामानाचा व्यक्त केलेला अंदाज
Forecast –
12-Jan – Min – 10.0 – Fog/mist in the morning and mainly clear sky later
13-Jan – Min – 10.0 – Fog/mist in the morning and mainly clear sky later
14-Jan – Min – 11.0 – Fog/mist in the morning and mainly clear sky later
15-Jan – Min – 13.0 – Fog/mist in the morning and mainly clear sky later
16-Jan – Min – 16.0 – Partly cloudy sky
17-Jan – Min – 16.0 – Partly cloudy sky with possibility of rain or Thunderstorm