Saturday, December 21, 2024

/

सात समुद्रापार पोचले बेळगावचे तिळगुळाचे दागिने

 belgaum

बेळगावमध्ये तयार होणाऱ्या तिळगुळाच्या दागिन्यांना केवळ भारतात नव्हे तर परदेशातून देखील मागणी आहे.बेळगावच्या प्राजक्ता बेडेकर तयार करत असलेल्या तिळगुळाच्या दागिन्यांना यावर्षी जर्मनी मधील बर्लिन येथून यावर्षी मागणी आली आहे.

अमेरिका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड,दुबई येथून देखील तिळगुळाच्या दागिन्यांना मागणी आहे.भारतातून यावर्षी हरियाणा आणि दिल्ली येथून अधिक मागणी आहे.म्हैसूर,बंगलोर,आंध्र प्रदेश,महाराष्ट्र आणि कर्नाटकातून देखील तिळगुळाच्या दागिन्यांची ऑर्डर आली आहे.

लहान मुलांच्या साठी किरीट,बासरी,हार, मनगट्या आदी तिळगुळाचे दागिने केले जातात.याशिवाय तिळगुळाचे हार,नेकलेस, गुच्छ,बाजूबंद,मंगळसूत्र,कर्णफले, कमरपट्टा,बांगड्या यांचा दागिन्यांच्या सेटमध्ये समावेश आहे.
दागिन्यांच्यासाठी लागणारा हलवा प्राजक्ता घरीच तयार करतात.Prajaktaa bedekar

अगदीच आवश्यकता भासली तर सांगलीहून हलवा मागवतात.लहान मुलांच्या दागिन्यांच्या सेटची किंमत २५० ते १००० रू इतकी आहे.महिलांच्या दागिन्यांच्या सेटची किंमत ५५० ते २५०० रू इतकी आहे.

सतरा वर्षापूर्वी आपल्या मुलीसाठी म्हणून प्राजक्ता बेडेकर यांनी दागिने तयार केले.ते दागिने पाहून त्यांच्या मैत्रिणींनी तिळगुळाच्या दागिन्यांची ऑर्डर दिली.नंतर दरवर्षी तिळगुळाच्या दागिन्यांची मागणी देशातून आणि परदेशातून वाढत गेली. सतरा वर्षापूर्वी सुरू केलेल्या तिळगुळाच्या दागिन्यांना आता चांगली मागणी वाढली आहे.आज जरी व्यवसाय वाढला असला तरी आपण याकडे एक छंद म्हणून पाहते असे प्राजक्ता बेडेकर सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.