खराब हवामानामूळे मसुर पिकावर मर रोग पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून कृषी खात्याने या रोगापासून मसूर सुरक्षित ठेवण्यासाठी हेक्सागोनाल हे 16 लिटर पंपासाठी 3 मि.ली. घालून फवारणी करावी असा सल्ला दिला आहे.
बेळगाव तसेच परिसरातील सुपीक जमीनील मसूर पीक सर्वश्रूत आहे. कारण जसा बासमती तांदूळ तशी मसूरही प्रसिद्ध आहे. चविला अत्यंत सुंदर असल्याने महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील व्यापारी येथील मसूर खरेदी करण्यासाठी दरवर्षी येतात.
हे पीक आल्यावर 12,000 रु क्विंटलने खरेदी होते. त्याच प्रमाणे जसे दिवस जातील तशी किंमत वाढून मसूर 20,000/22,000 हजार रु. क्विंटलपर्यंत विकली जाते. पेरणीवेळी तर 230 रु. किलोसुध्दा होते.
तथापी यंदा हिच मसूर पेरणी होऊन 20 दिवस झाल्यानंतर उगवण चांगली झाली असताना खराब होऊ लागली आहे. आठच दिवसाच्या खराब हवामानामुळे मसूर पिकावर मर रोग पडू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
अशा रोगावर कोणती औषध फवारणी करावी म्हणून कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी हेक्सागोनल (Hexagonal) हे 16 लिटर पंपासाठी 30 मि. ली. घालून फवारणी करावी असा सल्ला दिला आहे.