बेळगाव जिल्ह्यात आज गुरुवार दि. 20 जानेवारी रोजी नव्याने एकूण 442 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 189 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 3206 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आज घडलेल्या 442 बाधित रुग्णांना पैकी तब्बल 349 रुग्ण बेळगाव जिल्ह्यातील आहेत. आज कोरोना मृत्यूची नोंद झाली नसल्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 950 इतका स्थिर आहे. राज्यात आज नव्याने 47,754 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट -7.72 टक्के इतका असून आज 6,053 नमुने तपासण्यात आले आहेत. आज दिवसभर विविध जिल्ह्यात आढळलेले रुग्ण पुढील प्रमाणे आहेत. अथणी 13 बेळगाव 349, बैलहोंगल 6, चिक्कोडी 27, गोकाक 2, हुक्केरी 6, खानापूर 10, रामदुर्ग 4, रायबाग 9 आणि सौंदत्ती 16.
गेल्या दि. 1 जानेवारी 2022 पासून ते आजतागायत जिल्ह्यात दररोज अनुक्रमे 10, 12, 14, 45, 31, 64, 114, 70, 105, 129, 79, 269, 276, 227, 393, 468, 294, 418, 390 आणि आज 442 या संख्येत कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 2234 रुग्ण गेल्या 19 मे 2021 रोजी आढळून आले होते.
त्याचप्रमाणे सर्वाधिक 4270 रुग्णांना 1 जून 2021 रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, कोरोना आणि ओमिक्रॉन संक्रमण रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. घाबरू नका, काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य खात्याने जनतेला केले आहे.