Friday, April 26, 2024

/

पाण्यासाठी करावी लागणार धडपड?

 belgaum

पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे सोमवार दिनांक 10 पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा खंडित होणार आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कंत्राटी पद्धतीने काम करणारे पंप ऑपरेटर आणि इतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. या पूर्वी निवेदने देऊन आणि आंदोलने करून आपल्या मागण्या मान्य करा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली होती.

मात्र याकडे पाणी पुरवठा मंडळ तसेच पाणीपुरवठा काम पाहणाऱ्या कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे या कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फटका शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 belgaum

Mahapalika city corporation
सोमवारपासून कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे वेगवेगळ्या भागात पाणी सोडण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होण्यास, याबद्दलची कोणती पर्यायी व्यवस्था केली याची माहिती दिलेली नाही. शिवाय कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी कोणती उपाययोजना सुरू आहे याचीही माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी धडपड करावी लागणार की काय ?अशी अवस्था निर्माण झाली आहे.

पाणीपुरवठा : १०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय

महानगर क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात कोणताही व्यत्यय होऊ नये यासाठी शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी यांनी दिली.

“जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ, मनपा चे प्रशासकीय अधिकारी देखील आहेत, यांच्या निर्देशानुसार आम्ही पाणीपुरवठा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे म्हणाले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.