17 डिसेंबर रोजी झालेल्या शिवराय अवमान विरोधी आंदोलनात अटक झालेल्या 38 जणा व्यतिरिक्त एकूण 61 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यापैकी म ए समितीचे नेते मदन बामणे यांना देखील जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.
38 जणा व्यतिरिक्त अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होतेत्या सर्वानी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली. पण 31 डिसेंबर 2021 रोजी 42 जणांची याचिका आठवे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली, त्यानंतर त्यातील 41 जणांनी उच्च न्यायालयात जामीन मिळवला.
मदन बामणे यांची याचिका उच्च न्यायालयात न दाखल करता पुन्हा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली, परिस्थिती बदला नुसार येथेच जामीन मिळावा अशी मागणी केली ती आठवे जिल्हा सत्र न्यायालयाने मान्य करत मदन बामणे यांचा जामीन अर्ज विविध अटींवर मान्य केला आहे.
खडेबाजार पोलीस स्थानजातील 5 गुन्ह्यात 3 ऱ्या जे एम एफ सी न्यायालयाने मदन बामणे याना 5 खटल्यात जामीन मंजूर केले.सोमवारी एकूण सहा खटल्यात जामीन मंजूर झाला.
यांच्या वतीने अॅडव्होकेट महेश बिर्जे, अॅडव्होकेट एम.बी.बोन्द्रे ,अॅडव्होकेट रिचमॅन रिकी यांनी कामकाज पाहिले.
मदण बामणे यांना 45 दिवसां नंतर जामीन मिळाला असून आय पी सी 307 कर जिल्हा न्यायालयातून मिळालेला हा पहिला दिलासा आहे या अगोदर या केस मधील सर्वांना उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला होता.