Friday, January 24, 2025

/

‘चव्हाट गल्लीच्या युवकाचा प्रामाणिकपणा…’

 belgaum

सांबरा रोड बसवण कुडची येथे सोमवारी माणुसकीचे दर्शन घडले.एक लाख रुपये किंमतीचे रोख रक्कम दागिने असलेली बॅग परत करत बेळगावच्या ऑटो चालकाने प्रामाणिकपणा दाखवला आहे.नवनाथ कुडे असे त्याचे नाव असून तो बसवण कुडचीत चहाचे कॅन्टीन देखील चालवतो.

दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेची रस्त्यावर पडलेली बॅग त्याला सापडली त्याने महिलेचा पाठलाग करत बॅग परत करण्याचा प्रयत्न केला पण सदर महिला निघून गेली होती सदर बॅगेत 25 हजार रुपये रोख रक्कम दोन तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल होता.लागलीच सदर महिलेने बॅग मधील मोबाईलवर संपर्क केला त्यावेळी ऑटो चालक नवनाथ याने प्रामाणिक पणा दाखवत सदर महिलेला बेळगाव शहरात जाऊन पैशांची बॅग परत केली.

माणुसकी दाखवलेल्या नवनाथ यांना सदर महिलेने रोख रक्कम बक्षीस म्हणून घेण्याची विनंती केली मात्र नवनाथ यांनी प्रांजळपणे कोणतीही रक्कम घेण्यास नकार दिला इतकेच काय तर आपल्या वडिलांनी आपल्याला प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलाय तो आपण पुढं नेत असल्याचे सांगितले.सदर महिला गोवा वेस येथील एल आय सी कार्यालयात कर्मचारी आहे आपल्या दुचाकीवरून दररोज सांबरा रोड वरून ये जा करतात सोमवारी सकाळी त्या आपल्या दुचाकीवरून बेळगाव कडे निघाल्या होत्या त्यावेळी कुडची जवळ त्यांची बॅग गाडी मधून पडली होती अखेर बॅग मध्ये असलेली कागदपत्रे आणि मोबाईल मुळे नवनाथ यांना त्या महिलेला बॅग परत करण्यास मदत झाली.Navnath kude

आजकाल समाज पैश्याच्या विवंचनेत असताना अनेक तरुण पैसा मिळवण्यासाठी गैर मार्गाकडे वळताना दिसतात या पाश्वभूमीवर लाखों रुपयांचे आमिषही नवनाथला भुलवू शकले नाही ज्यांचा आपल्या श्रमावर विश्वास आहे त्यांना असल्या आयत्या पैश्याची गरज भासत नाही. नवनाथचा प्रामाणिकपणा नव युवकांच्या समोर आदर्श ठेऊन जातो.

चंगळवादी संस्कृतीत असे आदर्श लोकांसमोर आले तर समाजाला दिशा देणारे ठरते व्यसनापासून दूर असणाऱ्या युवकांना उकत्या पैशाची गरज भासत नाही.त्यांच्या मनाची जडण घडण श्रमशक्तीवर विश्वास ठेवणारी असल्यामुळे अश्या आदर्शवादी युवकांची समाज सदृढ होण्यासाठी नितांत गरज आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. Hats off to Navnath. His thought on Honesty practicing principle is one of the motivation.. Congrats!!! Amid cheating stories here and there this story restores faith in Humanity and the Honesty.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.