चिंचली मायाक्का देवस्थानसह एकूण चार मंदिरांवर व्यवस्थापन समिती,धर्मादाय खात्याचा निर्णय बेळगाव –
बेळगाव जिल्ह्यातील अ श्रेणीतील चार प्रसिद्ध मंदिरांवर व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याचा निर्णय धर्मादाय खात्याने घेतला आहे. भक्त किंवा नागरिकांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे.
त्यात बेळगाव शहरातील परमार्थ निकेतन हरी मंदिर,पंत बाळेकुंद्री येथील दत्तात्रय देवस्थान,गोडची तालुका रामपूर येथील विरभद्र देवस्थान व चिंचली तालुका रायबाग येथील मायाक्का देवी मंदिराचा समावेश आहे.
या चारही मंदिरांवर नऊ सदस्यांची व्यवस्थापन समिती नियुक्ती केली जाणार असून तिचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. समितीवर सदस्य म्हणून काम करू इच्छिणाऱ्या कडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील सदस्यांची नियुक्ती या समितीवर केली जाणार आहे.समितीमध्ये संबंधित मंदिराचे मुख्य किंवा सहाय्यक पुजारी, अनुसूचित जाती किंवा जमातीचा एक सदस्य तसेच दोन महिलांचा समावेश असणार आहे.