बेळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून आज बुधवारी जिल्ह्यात नव्याने 269 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे आज 13 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्याप्रमाणे राज्यातही कोरोनाचा कहर झाला असून आज नव्याने तब्बल 21,390 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, उत्तर कर्नाटकातील सात जिल्ह्यांपैकी आज सर्वाधिक बाधित रुग्ण बेळगाव जिल्ह्यात (269) आढळले असून त्याखालोखाल धारवाड जिल्ह्याचा (264) क्रमांक लागतो. उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये आज बुधवारी नव्याने आढळलेले कोरोना बाधित रुग्ण आणि कोरोना मुक्त झाल्याने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेले रुग्ण यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. बागलकोट : 13 बाधित, 0 डिस्चार्ज. बेळगाव : 269 बाधित, 13 डिस्चार्ज. धारवाड : 264 बाधित, 34 डिस्चार्ज. गदग : 43 बाधित, 6 डिस्चार्ज. हावेरी : 14 बाधित, 0 डिस्चार्ज. कारवार : 199 बाधित, 17 डिस्चार्ज. विजयपुरा : 64 बाधित, 13 डिस्चार्ज.