belgaum

बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू झालेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत अतिमहनीय व्यक्तींची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तांनी शहरातील कांही मार्गावर वाहतूक निर्बंध व बदल जारी केले आहेत.

bg

अधिवेशनासाठी अतिमहनीय व्यक्तींची त्यांच्या वाहनातून ये-जा सुरू राहणार असल्यामुळे आज सोमवारपासून येत्या 24 डिसेंबरपर्यंत गरजेनुसार शहरातील संबंधित मार्गावरील वाहतूक रोखली अथवा अन्यत्र वळवली जाणार आहे.

अतिमहनीय व्यक्तींच्या वावरामुळे सांबरा विमानतळ ते बागलकोट क्रॉस, मुतगा, शिंदोळी बसवनकुडची, अंडर ब्रिज, सांबरा अंडर ब्रिजपासून मुचंडीपर्यंतचा सर्व्हीस रोड या रस्त्यांवर रस्त्याशेजारी वाहन पार्किंगवर बंदी असेल. त्याप्रमाणे कनकदास सर्कल ते श्रीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटल नजीकचा सर्व्हीस रोड एसव्हीएस ते हॉटेल फेअरफिल्ड मेरियाॅट काकती,

कनकदास सर्कल ते सर्किट हाऊस, सांबरा अंडर ब्रिजपासून ते गांधीनगर, अशोक सर्कल ते क्लब रोड, डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, काँग्रेस रोड, धर्मवीर संभाजी चौकापर्यंत कॉलेज रोड या रस्त्यावर देखील वाहन पार्किंगवर बंदी असणार आहे.

उपरोक्त कालावधीत अवजड वाहतूक ग्लोब सर्कल, शौर्य चौक, बॉक्साइट रोड अशी वळवली जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.