कॅन्टोन्मेंट हद्दीत कॅम्प येणाऱ्या शौर्य चौकानजीक एका पाण्याच्या पाईपलाईनमधून मागील दोन महिन्यांपासून पाणी वाहत आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून त्या संदर्भातील काम नेमके कोणी करावे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे.
यासंदर्भात एल अँड टी कंपनीशी संपर्क साधला असता, हे काम मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस कडे येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्ड बेलगाम आणि मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस ने याकडे लक्ष देऊन पाण्याची गळती निवारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरात इतर ठिकाणी पाणी गळती झाल्यास सध्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या एल अँड टी या कंपनीच्या माध्यमातून लवकरात लवकर दुरुस्तीचे काम करण्यात येते. मात्र हा भाग असल्यामुळे मिलिटरी इंजिनियरिंग सर्विसेस कडे येत असल्याने त्यांनी हे काम करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान कोणत्याही प्रकारे पाण्याचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर काम व्हावे. अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याठिकाणी सतत दोन महिने पाणी वाया जात असल्यामुळे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.