Monday, January 13, 2025

/

युनियन जिमखाना संघाचा दणदणीत विजय

 belgaum

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या ‘अ’ गट वरिष्ठ साखळी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रतिस्पर्धी हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघावर 150 धावांनी दणदणीत विजय मिळविला. तडाखेबंद नाबाद 198 धावा झळकवणारा युनियन जिमखाना संघाचा कर्णधार वैष्णव संगमित्र हा या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला.

जिमखाना मैदानावर आज सकाळी प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने मर्यादित 50 षटकात 6 बाद 371 धावा काढल्या. त्यांच्या कर्णधार वैष्णव संघमित्र याने चौफेर फलंदाजीचे प्रदर्शन करताना 16 चौकार आणि 11 षटकारांचा सहाय्याने नाबाद 198 धावा झळकलेल्या. षटके समाप्त झाल्यामुळे त्याचे द्विशतक अवघ्या दोन धावांनी हुकले. अष्टपैलू दीपक राक्षे (26 धावा), प्रवीण हिरेमठ (35), अमेय भातकांडे (33), ऋषिकेश रजपुत (30) आणि सर्फराज मुल्ला (17) यांनी संघाला भक्कम धावसंख्या उभारून देण्यास हातभार लावला. हुबळी संघातर्फे इमार जाफर याने 2 गडी तर सतीश एन., तरुण हिरेमठ आणि निखिल दोडमनी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल दुपारी मैदानात फलंदाजीस उतरलेल्या हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा डाव 34.4 षटकात सर्वगडी बाद 221 धावा असा संपुष्टात आला. त्यांच्या महादेव (56) आणि इमार जाफर (62) यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला मात्र त्यांना इतर फलंदाजांची साथ लाभली नाही.

युनियन जिमखाना संघातर्फे दीपक राक्षे याने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करताना 68 धावा तब्बल 5 गडी बाद करण्याचा पराक्रम केला. त्याला शिवानंद पाटील (29/3) ऋषिकेश रजपुत (39/2) यांनी उत्तम साथ दिली. युनियन जिमखाना संघाचा कर्णधार वैष्णव संघमित्र याचे द्विशतक अवघ्या 2 धावांनी हुकल्यामुळे उपस्थित क्रिकेट शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.