Wednesday, January 8, 2025

/

पोलिस दोन तास लवकरच उतरले मैदानात

 belgaum

सरकारने रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जारी केला आहे, मात्र पहिल्याच दिवशी बेळगाव पोलिस दोन तास लवकरच मैदानात उतरले आहेत.बेळगावातील किर्लोस्कर रोड येथे रात्री ८ वाजल्यापासूनच पोलिसांनी नाईट कर्फ्यू सुरू केला आहे.आठ वाजता पोलिसांनी शिट्या वाजवायला सुरुवात केली. रात्रीचा कर्फ्यू हा बेळगाववासीयांसाठी दिवसभरानंतरचा एक विचित्र अनुभव ठरला आहे.

कर्नाटक सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत कर्फ्यू असणार आहे. यामुळे व्यापारी आणि खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक या साऱ्यांनीच रात्री दहाच्या पूर्वी सारे काही आवरण्याची तयारी केली होती. मात्र रात्री आठ पासूनच पोलिसांनी शिट्या मारण्यास सुरुवात केल्यामुळे खरेदीला आलेले नागरिक आणि विक्री साठी सज्ज असलेल्या व्यापारी या दोघांनाही त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली.

अचानक सर्वकाही खाली करा अशा पद्धतीने पोलीस काम करू लागले असून रात्री दहा चा नेमका अर्थ काय असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.Police

कर्फ्यू हा रोगराई पसरू नये यासाठी सरकारने जारी केलेला असला तरी त्यासाठी निश्चित कालावधी ठरविण्यात आलेला आहे .यामुळे त्या कालावधीचे पालन पोलिसांनी करावे. रात्री दहासाठीच्या पुढच्या अंमलबजावणीसाठी आठ पासूनच पूर्वतयारी करू नये .अशी मागणी होत आहे.

सलग दोन वर्षे झालेल्या लॉकडाऊन मुळे व्यापारी आणि सर्वसामान्य दुकानदारांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा होत असलेला नाईट कर्फ्यू हा व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे .रात्री 10 नंतर तो लागू झाल्यास साऱ्यांनाच सुखावह असला तरी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनी त्याचे स्वरूप बदलून टाकले असल्याचे पहिल्याच दिवशी दिसत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.