छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान करायला आलेल्या तिघां युवकांना संतप्त ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.बेळगाव तालुक्यातील होनगा गावांत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
शिव मूर्तीच्या कट्ट्यावर तिघे युवक येऊन गोंधळ घालत होते त्यावेळी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्या नंतर सदर युवकांना काकती पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे.
बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाल्या नंतर बेळगाव सह सीमा भागांत संताप उमटला असून गावागावात शिव प्रतिमांचा दुग्धभिषेक केला जात आहे. अश्यात पोलिसांनी तर बऱ्याच धार्मिक स्थळे, मंदिरे आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे मात्र जनतेनेही अश्या ठिकाणी लक्ष ठेवता सतर्कता बाळगणे जरुरी बनले आहे.