Saturday, April 27, 2024

/

तिसरे रेल्वे गेटच्या रस्त्याचे उजळले भाग्य!

 belgaum

कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून त्या अनुषंगाने तिसऱ्या रेल्वे गेट येथील खराब रस्त्याचे भाग्य देखील उजळले आहे. या रस्त्याचे व्यवस्थित पॅचवर्क करण्यात आल्यामुळे वाहनचालकात समाधान व्यक्त होत आहे.

टिळकवाडी तिसरा रेल्वे गेट येथील खराब झालेला रस्ता युद्धपातळीवर पॅच वर्क करून सुस्थितीत करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना कांही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या कांही महिन्यांपासून ओव्हर ब्रिजचे काम आणि खराब रस्ता याची अडचण अनेक वाहनधारकांना होत होती. या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत होता.

मात्र आता पॅच वर्क करण्यात आले असून रस्ता सुस्थितीत झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्याबरोबरच रस्ता किती दिवस असा सुस्थितीत राहील याबद्दल साशंकता देखील व्यक्त केली जात आहे. उद्यापासून कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.

 belgaum

त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांचे दुरुस्ती काम सुरू आहे. यातच तिसरा रेल्वे गेट जवळील रस्त्याचे काम झाले असून निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या आता दूर होऊ शकणार आहे.Third gate road

दरम्यान, लोकांची समस्या दूर करण्यासाठी नव्हे तर अधिवेशनासाठी सदर रस्ता दुरुस्त करण्यात आला असल्यामुळे सोशल मीडियावर समाधाना बरोबरच संतप्त उपरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एका फेसबूक यूजरने वारांगना ज्याप्रमाणे कामाच्या वेळी मेकअप करतात आणि काम झालं की उतरवतात, तशी अवस्था राजकीय नेत्यांनी बेळगावची केली आहे, असे परखड मत मांडले आहे.

हे सर्व जनतेसाठी नाही मंत्र्यांच्या भेटीसाठी आहे, मंत्री जी पधारिया आपका स्वागत है!, अधिवेशनासाठी हा तात्पुरता रस्ता आहे लोकांसाठी नाही 15 दिवसात तो खराब होणार आहे, हा तर अधिवेशनाचा चमत्कार आहे, अच्छे दिन आये!, अधिवेशन झिंदाबाद!, जगातील आठवे आश्चर्य!, हा रस्ता लोकांची समस्या सोडविण्यासाठी नाहीतर अधिवेशन सुरू होत असल्यामुळे त्यासाठी आहे आम्हाला मूर्ख समजू नये आदी प्रतिक्रिया सोशल मीडियावर फिरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.