बेळगाव शहर परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काल रात्री काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 6 दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
काकती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील मॅरियट हॉटेलसमोर रस्त्याशेजारी असलेल्या केदनूर येथील बाळू रामा चिंदी यांच्या गॅरेजमधील 5 दुचाकी त्याचप्रमाणे अन्य एका ठिकाणची दुचाकी अशा एकूण 6 दुचाकी गाड्या चोरट्यांनी काल सोमवारी रात्री लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
याबाबतची माहिती मिळताच काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ एस. आय. आणि पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच चोरट्यांचा शोध हाती घेतला आहे. सदर प्रकरणी काकती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.