बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली असून कर्नाटक सरकारला याबाबत कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी केली.
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाप्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.
भाषावार प्रांतरचना द्वारे कर्नाटकात डांबल्या गेलेल्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार आणि तेथील कानडी संघटना असंख्य अन्याय-अत्याचार करत आले आहेत. मराठी माणसावर सुड ऊवण्याच्या दृष्टीने राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला ही शाई लावण्याचा प्रकार घडला आहे.
बेळगावात अधिवेशन घेण्यात येत आहे .अशा प्रकारे होत असलेल्या कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं.
तसेच तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे,” अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.