Monday, December 30, 2024

/

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नकवी यांना शरद पवार यांचे पत्र

 belgaum

भाषिक अल्पसंख्यांक म्हणून कर्नाटकात सीमावासीयांवर प्रचंड अन्याय होत आहेत. मराठी भाषिकांना अपमानाची वागणूक मिळत आहे. असे असताना भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे बेळगाव येथे असणारे कार्यालय चेन्नईला हलविण्याचा घाट रद्द करावा. भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मराठी भाषिकांना योग्य तो न्याय द्यावा. या आशयाचे पत्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि सीमावासियांचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांना दिले आहे.

सोमवारी दि. 13 रोजी बेळगाव येथे घडलेल्या घटनेनंतर सीमावासीय युवकांचे शिष्टमंडळ दिल्लीत गेले आहे. त्यांनी काल खासदार अरविंद सावंत यांची भेट घेतली तर आज केंद्रीय मंत्री व इतर खासदारांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना घटनेची कल्पना देण्यात आली. भाषिक अल्पसंख्यांक खात्याचे कार्यालय बेळगाव येथून हटवण्याचा घाट घालण्यात येत आहे.Pawar meeting

एकीकडे अन्याय वाढत आहेत. अशा वेळी हे कार्यालय बेळगावात असण्याची गरज निदर्शनास येताच शरद पवार यांनी लागलीच मुख्तार अब्बास नकवी यांना पत्र लिहिले असून या प्रकरणी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे.

या शिष्टमंडळात तालुका समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,बेळगाव बिलोनग्ज टू महाराष्ट्रचे पियुष हावळ, निवडणूक रणनीतीकार संकेत जाधव आदी उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.