सोमवार दिनांक 20 रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत लागू असलेले 144 कलम अर्थात जमावबंदीचा आदेश आता बुधवारी सकाळी 6 पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे .
कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडामोडी घडू नयेत यासाठी ही खबरदारीची उपायोजना घेण्यात आली आहे. बेळगावात आधीच कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटना शांतता भंग करू शकतात .यासाठी ही काळजी घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली.
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा झाला. त्यानिमित्ताने घडलेल्या विविध गोष्टींच्या अनुषंगाने एकामागोमाग एक गोष्टी घडत असून त्यामुळे शांततेचा भंग होत असल्याचे पोलिसदलाला दाखल झालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता जमावबंदीचा आदेश बुधवारपर्यंत कायम ठेवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्तालय करणार आहे.