कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या हे आजही आमचे गुरु आहेत. आजही आम्ही त्यांना मानतो .भाजप पक्षात असलो तरी नेता म्हणून सिद्धरामय्या यांचेच नाव आमच्या डोळ्यासमोर येते.
मात्र ते खोटे बोलले आहेत, त्यामुळेच त्यांच्या खोटारडेपणा वर बोलण्यासाठी मी आज उभा आहे असे उद्गार माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी काढले.
बेळगाव जिल्ह्यात ठिकाणी बोलताना माजी विधानपरिषद सदस्य विवेक पाटील हे काँग्रेसमध्ये नाहीत .त्यांनी काँग्रेस सोडले आहे. अशा प्रकारचे उद्गार सिद्धरामय्या यांनी काढले होते. मात्र विवेकराव पाटील हे काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पक्षाकडे आपल्याला तिकीट मिळावे अशी मागणी केली होती.
मात्र पक्षाने त्यांना तिकीट दिले नसल्यामुळे आपण स्वतः त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे करून निवडून आणले होते. तरी ते काँग्रेस पक्षातच होते. अनेक वेळा त्यांनी अनेक माध्यमातून काँग्रेस पक्षात त्यांनी काम केले असून स्वतः सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेकदा काँग्रेस पक्षासाठी योगदान दिलेले आहे.
त्यांनी अधिकृतरित्या कोणत्याही दुसर्या पक्षात समावेश केलेला नाही. मात्र असे असताना सिद्धरामय्याजी खोटे बोलत आहेत .असे ते म्हणाले.
ते कसेही बोलले तरी आमचे गुरु आणि नेते आहेत त्यामुळे त्यांचा मान आम्ही राखणार आहोत .त्यांनी असे खोटे बोलू नये. असा सल्ला रमेश जारकीहोळी यांनी यावेळी दिला.