Thursday, May 23, 2024

/

भावाला राखण्यासाठी धावला भाऊ

 belgaum

जारकीहोळी बंधू वेगवेगळ्या पक्षात असले तरी अडचणीच्या वेळी ते एकमेकांच्या मदतीला धावून येतात. हे सगळ्यांनाच माहीत आहे. पक्षांची धोरणे वेगवेगळी असली तरी सगळे भाऊ आतून एक आहेत असे वारंवार बोलले जाते. अनेक वेळा राजकीय समीकरणात हे दिसून आले आहे.

सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये असलेला एक भाऊ, अपक्ष उमेदवार असलेल्या दुसऱ्या भावासाठी धावून आला आहे. आपल्या पक्षाची ध्येय धोरणे बाजूला टाकून धावून आलेल्या भावामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना ऊत आला असून जारकिहोळी बंधू कोणत्याही परिस्थितीत आपले बंधुत्व सोडत नाहीत.

हेच यातून दिसून आले आहे. विधानपरिषद निवडणुकीत सध्या भाजपच्या वतीने महंतेश कवटगिमठ रिंगणात आहेत .त्याचबरोबरीने काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी सुद्धा निवडणुकीत सहभागी झाले आहेत. अपक्ष म्हणून जारकीहोळी ब्रदर्स पैकी लखन जारकीहोळी उभे आहेत. दरम्यान के पी सी चे कार्यध्यक्ष या नात्याने सतीश जारकीहोळी चन्नराज हट्टीहोळी यांचा प्रचार करत आहेत.

 belgaum

तर पूर्वी काँग्रेसमध्ये असून आता भाजपमध्ये असलेले आमदार व माजी मंत्री रमेश जारकीहोळी इतके दिवस भाजपचा प्रचार करत होते, दरम्यान आपले पहिले मत भाजपच्या विजयासाठी आणि दुसरे मत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी असे रमेश जारकीहोळी यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे काही काळ महंतेश कवटगिमठ यांचा प्रचार केल्यानंतर आता ते आपल्या मूळ मुद्द्यावर आले असून आपले भाऊ लखन जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी उघडपणे बाहेर पडले आहेत.

Ramesh lakhan
निपाणी येथे काल झालेल्या सभेत अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री असलेले रमेश जारकीहोळी व्यासपीठावर बसल्यामुळे मोठा गहजब झाला. ज्यांना राजकीय समीकरणे माहीत आहेत,जारकीहोळी ब्रदर चा इतिहास माहीत असल्याने त्याचे जास्त काही वाईट वाटून घेतले नाही मात्र कर्नाटकाच्या एकंदर राजकारणात भाजपला मात्र धक्का देणारी ही गोष्ट घडली असल्याचे सध्या बोलले जात आहे .याच पद्धतीने काही झाले तरी सतीश जारकीहोळी लखन यांची बाजू घेणार आणि यावेळी लखन निवडून येण्यास मदत करणार या प्रकारच्या चर्चा काँग्रेसमध्ये होत्या. मात्र काँग्रेस वरिष्ठांनी सतीश हे काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत आणि ते असे काही करणार नाहीत. अशी विधाने केली आहेत.

मात्र आजच्या घडीला नेमके काय सुरू आहे हे निवडणूक झाल्यावर समजणार असून निकालाच्या वेळी प्रथम आणि द्वितीय प्राधान्याच्या मतांमध्ये कोणता कौल मिळतो त्यावरच सर्व जारकीहोळी ब्रदर्सनी नेमकी कोणती भूमिका घेतली हे लक्षात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.