मानव बंधुत्व वेदिके च्या माध्यमातून या वर्षी सहा डिसेंबरला होणार्या कार्यक्रमाचे नेतृत्व के पी सी सी चे कार्याध्यक्ष ,आमदार सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी करणार आहेत.
सदाशिनगर स्मशानभूमीमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे नेतृत्व पूर्णपणे राहुल जारकीहोळी यांच्याकडे देण्यात आले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून सतीश जारकीहोळी या कार्यक्रमाचे आयोजन करतात.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात सदाशिनगर स्मशानात एक दिवस वास्तव्य, भोजन सत्कार समारंभ, त्याच बरोबरीने मार्गदर्शनपर व्याख्याने आणि इतर उपक्रम राबवले जातात.
सतीश जारकीहोळी यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत हा उपक्रम हाती घेतला असून या वर्षी मात्र ते विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत .
त्याचबरोबर अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी स्वत आयोजित करणे हे आचारसंहितेत बसणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची शक्यता आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली मानव बंधुत्व वेदिकेचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.