तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव बेळगाव शहराचा वीज पुरवठा येत्या रविवार दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडित केला जाणार आहे.
हेस्काॅमने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी शहराचा वीजपुरवठा दिवसभर बंद असणार आहे. कॅन्टोन्मेंट, नानावाडी, हिंदवाडी, शहर, टिळकवाडी, शहापूर, एस. व्ही. कॉलनी, जक्कीरीहोंड, मारुती गल्ली, कपिलेश्वर फीडर,
हिंडाल्को (इंडाल), नेहरूनगर, सदाशिवनगर, शिवबसवनगर, वैभवनगर, शिवाजीनगर, जनबकुळ, फोर्ट रोड, शेट्टी गल्ली, खडेबाजार, माळी गल्ली, अयोध्यानगर, धारवाड रोड, बसवन कुडची, श्रीनगर, महांतेशनगर, चन्नम्मा सर्कल,
आयसीएमआर, अंजनेयनगर, कुमारस्वामी लेआउट, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, रामतीर्थनगर,
शिवालय, कणबर्गी, एक्झिबिशन सेंटर, यमनापूर, वडगाव, भाग्यनगर, मजगाव आदी भागातील वीज पुरवठा रविवारी दिवसभर खंडित केला जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.