ओमीक्रॉन धोका आणि घोंगावणारे संकट यावर मात करण्यासाठी कर्नाटक सरकारने आता नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात मंगळवार दिनांक 28 पासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून दररोज रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे.
या काळात कोणत्याही प्रकारे जमावाने एकत्र येणे, संचार करणे व्यवहार सुरू ठेवणे, आदी प्रकारांवर निर्बंध असणार आहे. मंगळवारपासून लागू असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम आणि 31 डिसेंबर वर्षाअखेरीच्या पार्ट्या आणि इतर कार्यक्रम आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती कर्नाटक सरकारकडून उपलब्ध झाली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बेंगलोर मध्ये सल्लागार समिती डॉक्टर्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांसोबत बैठक घेऊन नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. बार, पब आणि मंगल कार्यालयांमध्ये असलेल्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी कर्नाटक सरकारने जारी केली आहे .
फक्त चित्रपट गृहांना हा नियम लागू नसल्याचे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही नाईट कर्फ्यू लागू करण्याबद्दलचे निर्णय शनिवारपर्यंत झाले होते.. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे तसेच विधान परिषद निवडणुकांच्या माध्यमातून हा निर्णय काहीसा लांबला होता .
मात्र कर्नाटकात 30 हून अधिक रुग्ण आढळल्यानंतर शिवाय लक्षणं नसलेले रुग्ण आढळल्यामुळे प्रसार जास्त होऊ नये यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.