Saturday, December 21, 2024

/

भाजपकडून मराठी द्वेषाला खतपाणी : नवाब मलिक

 belgaum

कर्नाटकातील भाजप सरकार कन्नड भाषिकांना प्रोत्साहित करण्याबरोबरच त्यांच्या मराठी द्वेष भावनेला खतपाणी घालत आहे असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचा द्वेष आणि त्यांच्या पुतळ्यांची विटंबना समस्त देश कदापि खपवून घेणार नाही, असे परखड मत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नवाब मलिक एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपरोक्त मत व्यक्त केले. कर्नाटकातील मराठी द्वेष हा छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचता कामा नये. तुम्ही मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार करत आहात. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा तुमचा द्वेष महाराजांपर्यंत पोहोचला आहे, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.Nawab

पुतळा विटंबनेचे निंद्य कृत्य करणारे आणि त्यांच्या मागे असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर दडपशाही करण्याऐवजी कर्नाटक शासनाने त्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी, असे नवाब मलिक म्हणाले.

खासदार चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंची होटबँक तयार करत आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याचा आणि या पुतळा विटंबनेचा काही संबंध आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी या दोन्हीमध्ये कांही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

कर्नाटक सरकार निश्‍चितपणे कन्नड भाषिक लोकांना प्रोत्साहित करत आहे. त्यांच्या मराठी द्वेष भावनेला खतपाणी घालत आहे. चंद्रकांत पाटील यांना महाराजांचा इतिहास कळालेला नाही. मला वाटतं संघाच्या शाळेमध्ये जे शिकवण्यात आलं ते ते बोलत आहेत. या पद्धतीने बोलून उलट महाराजांचे नांव बदनाम करण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे, असे मतही कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.