पेजावर मठाचे प्रमुख विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी यांनी माध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शाळकरी मुलांना अंडी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.
खाद्यसंस्कृती बदलण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक व्यक्तीला अन्न निवडण्याचा अधिकार आहे. असे ते म्हणाले”
“मुले निष्पाप असतात आणि त्यांना ते काय खातात हे पूर्णपणे माहित नसते. बळजबरीने खाण्याच्या सवयी बदलण्यापेक्षा अंड्याची रक्कम सरकारने दिली तर बरे होईल. मुलांमध्ये जातीय भावना निर्माण होईल असे निर्णय घेण्यापासून सरकारला परावृत्त केले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
सक्तीच्या धर्मांतरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. नुकताच कर्नाटक सरकारने माध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये अंडी वाटप केले जाणार होते .
हा निर्णय जाहीर होताच कर्नाटकातील सर्वात प्रमुख मठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेजावर मठाच्या स्वामीजींनी विरोध केल्यामुळे आता हा निर्णय मागे घेण्याची वेळ सरकारवर आली आहेत.