शनिवारी होणार महामेळाव्या बाबत अधिकृत निर्णय-आगामी 13 डिसेंबर पासून बेळगावात कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने ज्यावेळी अधिवेशन भरवलं आहे त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळाव्याचे आयोजन करत कानडी अधिवेशनास महा मेळाव्याने जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. यावर्षी देखील अधिवेशना रोजी मेळाव्याची घोषणा समितीच्या बैठकीत होऊ शकते.
मध्यवर्ती महाराष्ट् एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली.
सर्व सभासदांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री दीपक दळवी यांनी केले आहे, अध्यक्ष श्री दीपक दळवी यांनी केले आहे.
शनिवारी होणाऱ्या बैठकीत महा मेळाव्याच्या आयोजना बाबत चर्चा होणार असून मेळाव्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या शिवाय सीमा प्रश्नाच्या दाव्या बाबत देखील बैठकीत चर्चा होऊ शकते.